Advertisement

विषबाधेमुळे तिसऱ्या बालकाचाही मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 26/02/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-तालुक्यातील बागझरी परिसरात विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तीन संख्या भावंडांचा मृत्यु झाला आहे.यातील त्यांच्या आईची प्रकृती चिंताजनक असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी परिसरात एक दुर्दैवी घटना आज ( दि.26 ) सकाळी समोर आली आहे. काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या घरात विषबाधेमुळे त्यांच्या दोन मुली साधना ( वय 6 ) आणि श्रावणी ( वय 4 ), मुलगा नारायण ( वय 8 महिने ) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे. तर मयत मुलांची आई भाग्यश्री ( वय-28 )यांची देखील प्रकृती चिंताजनक असून या घटनेने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

Advertisement

Advertisement