Advertisement

परळीत तीन गावठी रिव्हॉल्वर जप्त

प्रजापत्र | Tuesday, 22/02/2022
बातमी शेअर करा

बीड-परळी शहरात पोलीसांनी तीन गावठी रिव्हॉल्वर जप्त करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान त्या दोघांकडे गावठी रिव्हॉल्वर कोठुन आले याचाही तपास पोलीस करत आहेत. एकाच वेळी तीन गावठी रिव्हॉल्वर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

परळी शहर ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी कारवाई करत तीन गावठी रिव्हॉल्वर जप्त केल्या असुन दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांची दुपारी उशिरापर्यंत कसुन चौकशी करण्यात येत होती. परळीत यापूर्वीही गावठी रिव्हॉल्वर आढळल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यातच आज

एकाचवेळी तीन गावठी रिव्हॉल्वर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement