Advertisement

पुन्हा जिल्हावासियांना दिलासा;कोरोनाचा आलेख घसरू लागला

प्रजापत्र | Saturday, 10/10/2020
बातमी शेअर करा

बीड-वाढती कोरोनाची रुग्ण संख्या बीड जिल्हावासियांसाठी डोकेदुखीची बाब ठरू लागली असताना शनिवारी पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे.दुपारी १ वाजता आलेल्या अहवालामध्ये ११४ जण पॉझिटिव्ह आले असून तब्ब्ल ८४७ जण निगेटिव्ह आले आहेत. 
               जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जरी असले तरी शनिववारी  (दि.१०) कोरोनाचा आलेख मोठ्या प्रमाणावर घसरला असल्याचे समोर आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई-९, आष्टी-२४, बीड३४ धारूर-३ गेवराई-३ केज-४, माजलगाव-१६ परळी-७, पाटोदा-४, शिरूरकासार -७ आणि वडवणीत ३जणांना कोरोनाची लागण झाली.

 

Advertisement

Advertisement