Advertisement

कोरोनाचा आलेख घसरला;आज पॉझिटिव्हची संख्या 100 च्या आत

प्रजापत्र | Thursday, 08/10/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जरी असले तरी गुरूवारी (दि.8) कोरोनाचा आलेख मोठ्या प्रमाणावर घसरला असल्याचे समोर आले. दुपारी 1 वाजता आरोग्य विभागाने दिलेल्या कोरोना अहवालामध्ये फक्त 94 जण पॉझिटिव्ह आले असून तब्बल 791 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी-9, बीड-24, धारूर-9, गेवराई-6, केज-6, माजलगाव-4, परळी-9, पाटोदा-3, शिरूर-3 आणि वडवणीत दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान कोरोनाचा घसरलेला आलेख बीड जिल्हा वासियांसाठी दिलासादायक बाब आहे.
 

Advertisement

Advertisement