Advertisement

बीड : बीड जिल्ह्यात एसीबीमध्ये तत्कालीन उपाधिक्षकाच्या काळात सुरु असलेल्या 'वसुली ' ची तक्रार समोर आल्यानंतर आणि कथित रेटकार्ड 'प्रजापत्र ' ने जाहीर केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.  अखेर  ज्या आरटीओ कार्यालयातील लाचेच्या मागणीच्या प्रकरणावरून या प्रकरणाला वाचा फुटली होती , त्या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीड ग्रामीण पोलिसात आरटीओमधील वाहन निरीक्षक रविकिरण भड आणि खाजगी व्यक्ती प्रवीण गायकवाड या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख बक्षु अमीर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला . 
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ ) लाचखोरी जग जाहिर आहे. या बाबतीत एक तर कोणी रितसर तक्रार करत नाही. सामाजिक कार्यकर्ते अॅड. बक्शु अमीर शेख यांनी या संदर्भात पाठपुरावा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पंरतु सप्टेंबर 2021 ते  जानेवारी2022 पर्यत पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती. यामुळे शेख बक्षु अमीर यांनी थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तसेच या तक्रारीसोबत एसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कोणत्या कार्यालयाकडून किती वसुली केली जाते असा दावा करणारी माहितीही दिली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने २ दिवसांपूर्वी सदर तक्रार कार्यवाहीसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली. यासंदर्भात 'प्रजापत्र ' ने वृत्त प्रसिद्ध करताच सर्वत्र खळबळ माजली होती. 

Advertisement

Advertisement