दिल्ली : घडलेला प्रकार हा भयंकर असून या प्रकाणाबाबत प्रत्येक वेळी नवीन काहीतरी कळत असुंन हे सगळं थांबायला हवं अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले आहे.
घडलेला प्रकार हा संतापजनक असून आम्हाला न्यायालयात पुन्हा तोच युक्तिवाद नको आहे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हाथरसमधील साक्षीदारांना कशा पद्धतीने सुरक्षा पुरवली जात आहे यासंबंधी सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.हाथरस प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाकडे नि:पक्षपातीपणे तपास करण्यासाठी सीबीआय चौकशी केली जावी अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे आपण आधीच सीबीआय चौकशीची मागणी केली असल्याची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेतल्याने कोणीही आपल्या हेतूसाठी खोट्या आणि बनावट गोष्टी पसरवू शकणार नाही असा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
प्रजापत्र | Wednesday, 07/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा