मुंबई- राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये अनेक नेते, आमदार, खासदार, डॉक्टर्स आणि अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी '55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा' असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानही पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते, तरीही या काळात जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात मुंबई पोलिस दलातील जवळपास 123 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे आता लवकर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.
बातमी शेअर करा