Advertisement

अंमळनेरमधील मानपान नाट्यातून भिडले दोन गट;परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रजापत्र | Wednesday, 01/04/2026
बातमी शेअर करा

अंमलनेर-गावात रामनवमी उत्सव आणि हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती दिवशी सरपंच पुत्राला मान न दिल्याच्या कारणावरून दोन गटात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाली.नंतर थेट दोन गटात हाणामाऱ्या झाल्याने यात गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला मात्र पोलिसांनी नंतर दोन्ही गटातील व्यक्तींवर गुन्हा दाखल केले आहेत.
     अंमळनेर येथे रामनवमीच्या दिवशी सप्ताह समाप्ती होणार होती.यावेळी सरपंच पुत्र गोविंद श्रीपती गाडे समर्थकांसह कार्यक्रमस्थळी पोहचले.गाडे यांना यथोचित सन्मान न मिळाल्याने त्यांचे समर्थक यांनी आयोजकांशी वादावादी घालून कार्यक्रमात राडा घातला.यावेळी आधी शिवीगाळ आणि नंतर थेट वाद मारामारीतच रूपांतर झाल्याने यात अनिल हडतगुने यांना प्रचंड मार लागला आहे.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सोमनाथ पांगारे अभि पातूरकर,माउली अष्टेकर देखील जखमी झाले आहेत.दरम्यान अंमळनेर पोलिसांनी यात उशिरा हस्तक्षेप करून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.मारहाण व शिवीगाळ प्रकरणी सोमनाथ गाडे,गोविंद गाडे,अक्षय गाडे,बाळू कुऱ्हाडे,सुंदर गाडे,निखील गाडे,सुदर्शन गाडे,सुरेश गाडे व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत.तर ऍट्रॉसिटी प्रकरणात सोमनाथ पांगरे,अनिल हडतगुणे,महेश हडतगुणे,अभिमन्यू पाथरुडकर,उद्धव पवार याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान मानपानाच्या नाट्यावरून थेट धार्मिक कार्यक्रमातच रंगलेले वाद आणि शब्दांची वाहिली गेलेली लाखोली आणि मारहाण यामुळे या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली होती.   

Advertisement

Advertisement