पुणे : शिवेसेनेशी संलग्नित असलेल्या युवा सेनेच्या पुणे शहराच्या कसबा विभागाचे प्रमुख दीपक मारटकर यांची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली.फरासखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या नुसार "दीपक मारटकर यांच्यावर रात्री 12.15 च्या सुमारास 4 ते 5 मारेकऱ्यांना तीक्ष्ण हत्याराने वार केले. पूर्ववैमनस्यातून तसेच राजकीय कारणावरून ही घटना घडल्याची शक्यता आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. यात काही नावे पुढे आली असून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे." ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
बातमी शेअर करा