Advertisement

बलात्कार झालाच नाही.हाथरसमधील पोलीस अधिकार्याचे म्हणणे

प्रजापत्र | Friday, 02/10/2020
बातमी शेअर करा

दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी न्यायाची मागणी केली आहे. "हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू झाला नाही तर तिला मारण्यात आले," असाही आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. मात्र उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी संबंधित मुलीवर बलात्कार झाला नसल्याची माहिती माध्यमांना दिली.प्रशांत कुमार म्हणाले, "न्यायवैद्यक चाचणीमध्ये या मुलीचा मृत्यू मानेला झालेल्या दुखापतीमुळे झाला. तसेच गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये वीर्य सापडलेले नाही असे सांगितले. काही लोकांनी जातीय तणाव निर्माण होण्यासाठी प्रकरणाला वेगळं वळण दिलं. त्यांना शोधून कायदेशीर कारवाई केली जाईल."

Advertisement

Advertisement