Advertisement

राज्यात सापडले ओमायक्रॉनचे आणखी 3 रुग्ण

प्रजापत्र | Wednesday, 15/12/2021
बातमी शेअर करा

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे आणखी 3 नवीन रुग्ण बुधवारी सापडले आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यात दोन जणांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यासोबतच महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या आता 31 झाली आहे.

 

 

उस्मानाबादेत  दोन रुग्ण सापडले आहेत. हे दोघे संयुक्त अरब अमिरात येथून उस्मानाबादच्या बावी येथे आले होते. त्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिनोम सीक्वेन्सिंग करण्यात आली. त्याचाच बुधवारी निकाल समोर आला. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्यासोबत आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचा जिनोम सीक्वेन्सिंगचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे, गावात चिंता वाढली आहे. यासोबत बुलडाण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

Advertisement

Advertisement