Advertisement

राहुल गांधी यांना धक्काबुक्की, हाथरसकडे पायी जाताना पोलिसांनी रोखलं.

प्रजापत्र | Thursday, 01/10/2020
बातमी शेअर करा

 दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपांनंतर असंतोषाचं वातावरण आहे. या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.हाथरस प्रकरणावरून सोनिया गांधी यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. दरम्यान त्यांना रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे.राहुल गांधी नोएडामार्गे हाथरसकडे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला. त्यानंतर राहुल गांधी चालतच हाथरसच्या दिशेने निघाले होते.

Advertisement

Advertisement