Advertisement

ओबीसी आरक्षणासाठी स्पेशल अधिवेशन घ्या - पंकजा मुंडे यांची मागणी

प्रजापत्र | Monday, 06/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई - ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढावा, त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी करणारं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

 

 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे तसेच राज्य सरकारच्या अध्यादेशाला न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

 

राज्य सरकारच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सन्माननीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला आहे, ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट नाही झाली हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे, त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement