मुंबई दि.25 नोव्हेंबर – राज्यातील सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालयं बंद होती. राज्य सरकारने टप्या टप्याने वर्ग सुरु केले. या अगोदर 5 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता 1 ते 4 चे वर्ग सुरु करायला देखील राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
कोरोनाचा जोर ओसरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे.
जवळपास दोन वर्षानंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता.
त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहे