केज-तालुक्यातील उमरी पाटीजवळ केज-बीड रोडवरील एका खवा बनवणाऱ्या बनावट कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे.एएसपी पंकज कुमावत व अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी,अन्न सुरक्षा अधिकारी तन्मडवार यांच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
बुधवारी (दि.२४) रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळल्यावरून केज ते बीड जाणारे रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्या समोर उमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनीचे मालक धनंजय महादेव चोरे (रा.जिवाचीवाडी हल्ली मुक्काम उमरी शिवार ) हे त्यांच्या कंपनीमध्ये दुधाचे पावडर पासून बनावट खवा तयार करत त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सदर ठिकाणी
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी,अन्न सुरक्षा अधिकारी तन्मडवार यांना सोबत घेऊन कुमावत यांनी धाड टाकली.यावेळी दुधाचे पावडरमध्ये वनस्पती रूची तेल मिक्स करून त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने २९५८ किलोग्राम किंमतीचे ५ लाख ३७ हजार ४८० रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून कंपनीला सील ठोकण्यात आले आहे. सदरची कारवाई सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सय्यद इम्रान हाश्मी,श्री.तन्मडवार,मारुती माने, बालाजी दराडे,बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक रामहरी भंडाने, राजू वंजारे, सचिन आहंकारे,संतोष राठोड,श्री.शेंडगे यांच्या वतीने करण्यात आली.
प्रजापत्र | Thursday, 25/11/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा