Advertisement

शिवसेनेतून भाजपात गेलेले ‘ते’ १० नगरसेवक अपात्र

प्रजापत्र | Friday, 29/10/2021
बातमी शेअर करा

अलिबाग – शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्‍या माथेरानमधील १० नगरसेवकांना जिल्‍हाधिकारी डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांनी अपात्र ठरवले आहे. महाराष्ट्र स्थानिक प्रधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३ (१) आणि महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८७ च्या कलम ८ (१) मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. पक्षांतर करणे या दहा जणांना महागात पडले आहे.

 

अंतर्गत वादामुळे माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्‍या १० नगरसेवकांनी २७ मे २१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. कोल्‍हापूर येथे भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. यानंतर शिवसेनेने या पक्षप्रवेशास आक्षेप नोंदवला. या सर्व १० नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे यासाठी शिवसेना सचिव अनिल देसाई व माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली होती.

Advertisement

Advertisement