Advertisement

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

प्रजापत्र | Thursday, 28/10/2021
बातमी शेअर करा

देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मात्र असे असतांनाही कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरुच आहे. राज्याजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पाटील यांना याच वर्षात दोनदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

त्यांनी स्वत: आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते देखील सध्या कोरोनावरील उपचार घेत आहेत.
 

Advertisement

Advertisement