निलंगा:-(प्रतिनिधी) -निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील छत्रपती शिवाजी चौकात आज दिनांक १४ आक्टोंबर रोजी संध्याकाळी ४:४५ वाजता येथील लातुर-जहिराबाद महामार्गावर लहान मुलगा रस्त्याच्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक शिवाजी चौकात ट्रक आल्याने त्या ट्रकखाली चिरडून एका ६ वर्षीय माणीक बबलु अंतरेड्डी या बालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.
याची सविस्तर माहिती अशी की, लातुर-जहिराबाद महामार्गावर औराद येथे या मार्गाला फुटपाथ नसल्यामुळे येथील हाथगाडे व प्रवासी वाहतुक करणारी वाहने रस्त्यावर थांबलेल्या असल्याने येथील रस्त्यावर प्रवास करणे फार जिकीरीचे झाले आहे. येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकिस अडथळे होत तर आहेत शिवाय अचानक अंतर्गत रस्त्यावर फिरणारे वाहनांची सतत धडका बसत आहे. अशीच एक घटना नऊ वर्षापुर्वी एका लहान बालकास भरघाव ट्रकने चिरडले होते तशीच घटना आज पुन्हा येथील लातुर-जहिराबाद महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सध्याकाळी ४:४५ वाजता माणीक बबलु अंतरेड्डी नावाचा बालक त्याच्या आईसोबत असताना रस्ता ओलांडुन पलीकडे घराकडे जात असताना एक ट्रक आल्याने व हातातील लहान मुलगा हा घाबरुन हात सोडुन जाण्याच्या अवस्थेत तो ट्रकखाली पडल्यामुळे या सहा वर्षीय बालकाचा आज पुन्हा एक बळी गेला.
त्यामुळे येथील महामार्गावर होणारी वाहतुकिचे अडथळे पोलीस प्रशासनाने तर वेळेतच प्रतीबंध घालत रस्ता अडथळामुक्त तर करण्यात यावे शिवाय येथील लोकांना फिरण्यासाठी तात्काळ कंत्राटदार व शासनाने फुटपाथ तयार करणे गरजेचं असल्यामुळे तेथे फुटपाथ लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.