राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयं देखील सुरू होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असली तरी यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.
उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती दिली. यात विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं गरजेचं असणार आहे. तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यात तेथील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळी नियमावली असेल असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष लसीकरण मोहिम राबविण्याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
बातमी शेअर करा