Advertisement

 पोलीस भरती परीक्षेत 'हायटेक कॉपी'

प्रजापत्र | Sunday, 10/10/2021
बातमी शेअर करा

जळगाव- जळगाव शहरात झालेल्या पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान एका परिक्षार्थीने केंद्रात मोबाईल घेऊन जात प्रश्नपत्रिकेचे फोटो मित्रास पाठवले. मित्राने उत्तरे पाठवल्यानंतर तो प्रश्नपत्रिका सोडवताना सापडला. तर एकाने कानात ब्लु टूथ लपवून ठेवले होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी परिक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

 

 

प्रश्नपत्रिका फोडणार उमेदवार नाशिकचा

नॉर्थ महाराष्ट्र क्नॉलेज सीटी कॉलेज या परिक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड (वय २७, रा. पांझणदेव, पो. नागापुर, ता. नांदगाव, जि. नाशिक) या उमेदवाराने परिक्षा दिली. आव्हाड याने लपवुन एक मोबाईल थेट परिक्षा केंद्रात नेला. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने फोटो काढुन घेत मित्राच्या मोबाईलवर पाठवले. यांनतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. त्यानुसार आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. यानंतर आव्हाड व त्याच्या मित्र या दोघांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड याने लघुशंकेचे कारण देत परिक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर मोाबईल आणल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

 

कानात लपवून आणले ब्लुटूथ

दुसऱ्या एका घटनेत वाघनगर येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रतापसिंग गुलचंद बालोद (वय २५, रा. वैजापुर, ता. आरंगाबाद) हा उमेदवार परिक्षेसाठी आला होता. त्याने एटीएम कार्डच्या आकाराचे एक डिव्हाईस सोबत आणले होते. या डिव्हाईसमध्ये मेमरी कार्ड होते. ते ब्लु टुथने कनेक्ट करुन स्पीकरमधुन आवाज घेण्यात आला होता. अत्यंत लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवून ठेवला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने कसुन तपासणी करण्यात आली. परिक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, प्रतापसिंगच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement