मुंबई-कोरोना साथीचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात समोर आला आहे. ICMR ने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे लागले. या सर्वांचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर मानसिक परिणाम झाला आहे.
भारतात, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांविरुद्ध देशाच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराची नोंद झाली, ज्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांना कामाची ठिकाणे सोडावी लागली, असे अभ्यासात म्हटले आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे अभ्यासात म्हटले आहे.
बातमी शेअर करा