Advertisement

खा.प्रीतम मुंडेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

प्रजापत्र | Thursday, 12/08/2021
बातमी शेअर करा

 

दिल्ली-केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा पदभार सांभाळणारे नवनियुक्त मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी गुरुवारी (दि.१२)दिल्ली येथे भेट घेतली. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाविषयी चर्चा करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी यावेळी खा.प्रितम मुंडे यांनी त्यांच्याकडे केली.

 

         नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेला राज्य सरकारच्या वाट्याचा निधी मिळत नसल्याने प्रकल्पावर विपरीत परिणाम होत असल्याचे खा.प्रितम मुंडे यांनी निदर्शनास आणून देताना प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर रेल्वे विभागाची बैठक घ्यावी व यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी केली.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देताना प्रकल्पासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले.या भेटीमुळे नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला निश्चित गती मिळेल असा विश्वास यावेळी खा.प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला.  

 

 

Advertisement

Advertisement