बीड -गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका घरात गोवा,बाबा,राजनिवास आदी गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषिकेष मरेवार यांना कळताच त्यांनी या घरावर धाड टाकत ६३ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर गणेश दुधाळ असे आरोपीचे नाव आहे.मादळमोही येथील माऊली ट्रेडर्स या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीत दुधाळ यांनी अवैध गुटख्याचा साठा केला होता. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी धाड टाकून ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, व ऋषिकेष मरेवार,सय्यद इम्रान हाश्मी यांच्या वतीने करण्यात आली.
बातमी शेअर करा