तोंडार- उदगीर तालुक्यातील लोहारा शिवारात शेल्या चारत असताना बायडाबाई उर्फ सुनिता दयानंद काबंले या म्रत्यु पावल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की लोहारा शिवारातील राजकुमार शेषराव पाटील यांचा शेतात ज्याचा सर्वे नंबर ६१७ या शिवारात बायडाबाई उर्फ सुनिता दयानंद काबंले वय वर्ष ४९ या शेल्या चारण्यासाठी शेतात गेल्या असताना दि: ३१/५/२१ रोजी चा दुपारी साधारण ०३;३० वाजण्याचा दरम्यान अचानक पणे वादळी वार्यासह, मेघगर्जनेसह सुसाट वार्यासह पाउस चालु झाला, यात बायडाबाई उर्फ सुनिता दयानंद काबंले याचा विज पडुन जागीच म्रत्यु झाल्याची माहीती उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांना कळताच त्याचा आदेशान्वये मंडळाधिकारी पंडीत जाधव, तलाठी गिता पाटील सह उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे याचा मार्गदर्शखाली लोहारा चे बिट अंमलदार रमेश काबंले व पोलीस नाईक संतोष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदर प्रेत हे स्वविच्छदनासाठी उदगीर चा सामान्य रुग्णालयात दाखल केला आहे, म्रतदेह स्वच्छविच्छदन उद्या सकाळी करण्यात येईल व सदर महिलेचे म्रतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याचा कुटुंबीयांचा ताब्यात देण्यात येईल अशी माहीती देवर्जन महसूल मंडल चे मंडळाधिकारी गणेश हिवरे यानी दिली, पुढील तपास बिट अंमलदार रमेश काबंले हे करत आहेत.