Advertisement

बीड जिल्ह्यातील ही पाच शहरं होणार lockdown

प्रजापत्र | Sunday, 09/08/2020
बातमी शेअर करा

बीडः बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज ही ५ शहरे १२ ते २१ आँगस्ट या काळात पूर्णतः  lockdown करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील ५ प्रमुख शहरांमध्ये टाळेबंदी जाहिर केली आहे. १२ ते २१ आँगस्ट या काळात बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज या ५ शहरात ही टाळेबंदी लागु राहणार आहे. देशभर अनलाँक सुरु असतानाच बीड जिल्हयात मात्र प्रशासनाने lockdown ची भुमिका घेतली आहे. जिल्ह्यात सर्वत्रच आता कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. या पार्श्वभूमीवर पाच शहरातला lockdown सामान्यांच्या अडचणी वाढविणारा आहे.

Advertisement

Advertisement