Advertisement

व्यवस्थित नियोजन करूण कामे करा अन्यथा सस्पेंन्ड

प्रजापत्र | Wednesday, 12/05/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि १२-  गेवराई उपजिल्हा रुग्णलयात आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली व आढावा बैठक घेतली यावेळी योग्य नियोजन करा वरिष्ठ यांच्याशी सन्मन्वय करून चांगले आणि उत्तम नियोजन करावे अन्यथा सस्पेंड करील असा ईशारा या आढावा बैठकीत आयुक्त केंद्रेकर यांनी दिला आहे .

   आढावा बैठकीत मार्गदर्शन व सुचना देताना ते बोलत होते यावेळी जिपचे मुुख्यकार्यकारी अधीकारी अजित कुंभार , बीड पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी , आ लक्ष्मण पवार , तहसिलदार सचिन खाडे , वैधकीय अधीक्षक महादेव चिंचोळे , तालुका वैधकीय अधीकारी संजय कदम , डॉ राजेश शिंदे , डॉ प्रविण सराफ ,गटविकास अधीकारी एडी सानप , तहसिलदार प्रशांत जाधवर , मुख्याधीकारी उमेश ढाकणे यांची या बैठकित उपस्थित होते .
   
      पुढे बोतना ते म्हणाले की आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता सगळीकडे आहे रूग्ण तपासाता त्या रुग्णांला किती ऑक्सिजन लागतो तेवढाच ऑक्सिजन रुग्णाला द्या मोठमोठाले सिंडेन्डर लावुन ऑक्सिजन व्यर्थ वाया जाऊ नये यांची वैवस्थित काळजी घ्या अचुक नियोजन तसेच वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा अडचण असेल तर तीच्यावर मात कशी करता येईल .

हे तपासा उगच काही करू नका ज्यांनी नियोजन केले आहे त्यांना कशाचीही कमतरता भासनार नाही ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करा अन्यथा चुक माझ्या निदर्शनास आल्यानंतर कुणालाही माफी दिली जाणार नाही मी कसलाही विचार न करता डायरेक्ट सस्पेंड करील असा ईशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे जवळपास एक तास ही बैठक चालु होती या नंतर त्यांनी उपजिल्हा रूग्णलयाची पाहणी करूण  परिस्थितीची चौकशी केली.
मात्र आयुक्त यांच्या दौ-यामुळे अधीकारी कर्मचारी यांच्यात चांगलीच धादल उडाली होती.

 

सुविधांचा अभाव 
पाहणी करता वेळी कोविड वार्डात ज्यावेळी आयुक्त केंद्रेकर जात होते त्यावेळेस प्रवेश करण्यासाठी पी पीई किट देखील नव्हती यामुळे आयुक्त केंद्रेकर यांनी अधीकारी कर्मचारी यांना चांगलेच धारेवर घरले व जिपचे मुख्यकार्यकारी अधीकारी अजित कुंभार यांनी या ठिकाणी स्वत: लक्ष घालावे असे आदेश दिली .

 

Advertisement

Advertisement