गेवराई-तालुक्यातील संगम जळगावजवळील गोदापात्रात बुडून आईसह पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.९) सकाळी उघडकीस आली.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
पल्लवी गोकुळ ढाकणे (वय-२६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय-५) दोघे (रा.संगम जळगाव) अशी मयताची नावे असुन नेहमी प्रमाणे गोदापात्रात कपडे धुण्यासाठी ही महिला आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या सोबत गेली होती.यावेळी खेळत असताना समर्थ पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता,यावेळी त्याला वाचविण्यासाठी पल्लवी ढाकणेने पाण्यात उडी मारल्याने दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला.मयताचे शवविछेदन करण्यासाठी प्रेत गेवराई उपजिल्हा रूग्णलयात आणण्यात आले असून याघटनेने खळबळ उडाली आहे.
प्रजापत्र | Sunday, 09/05/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा