मुंबई : राज्य सरकारने अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील लॉकडाऊन अधिक कडक केले आहे. आता खाजगी वाहनांना अंतर जिल्हा प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर लग्नाचे कार्यक्रम केवळ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत आणि पुढील अवघ्या दोन तासात उरकावे लागणार आहेत. शासकीय कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रात लावलेल्या लॉकडाऊनचे नियम बुधवारी अधिक कठोर केले. आतापर्यंत जिल्हांतर्गत आणि अंतरजिल्हा प्रवासासाठी बंधने नव्हती. आता मात्र खाजगी वाहनांना अंतरजिल्हा प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, वैद्यकीय कारणास्तव होणारा प्रवास आणि अंत्यविधीसाठी जावे लागणार असेेल तर खाजगी वाहनाने जिल्ह्याबाहेर जाता येईल. सार्वजनिक वाहनातून वाहनाच्या 50 टक्के क्षमतेने प्रवासी घ्यावे लागणार आहेत.
आता लग्नसमारंभ केवळ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत करता येतील. विशेष म्हणजे ही उपस्थिती देखील दोन तासापेक्षा अधिक काळ चालणार नाही. हे नियम 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत.
प्रजापत्र | Wednesday, 21/04/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा