नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन तब्बल २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं नाशिक हादरले आहे. राज्य सरकारनं या दुर्घटनेची तात्काळ दखल घेतली असून स्थानिक प्रशासनला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. मदत व बचावकार्य तातडीनं हाती घेण्यात आलं आहे.
मृतांची संख्या वाढण्याची जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केली शक्यता
मृतांचा आकडा वाढला, २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती
दहा मिनिटांच्या ऑक्सिजनसाठी किती जीव गेले? या निर्दयी प्रशासनाला आणि व्यवस्थेला जाग केव्हा येणार? इतके जीव घेऊनही आरोग्याशी खेळ सुरू आहे - नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया
बातमी शेअर करा

