बीड : जिल्ह्यातील कोरोनाच्या आकड्याने शनिवारी आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून शनिवारी जिल्ह्यात तब्बल ८३रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८६४ तर सक्रिय रुग्णांची संख्या ४०७ इतकी झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण परळी तालूक्यातील ३६ असून बीड तालुक्यात २० अंबाजोगाई ८माजलगाव२, धारुर २,शिरुर १, केज २ , वडवणी १गेवराई ७, पाटोदा ४ इतके रुग्ण आहेत. यात अँटीजन टेस्ट मध्ये काही रुग्णांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढली आहे. कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला असून जनतेने घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची मात्र गरज आहे.
रुग्णाचे राहण्याचे ठिकाण पुढील प्रमाणे-
बातमी शेअर करा