मुंबई– नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा विश्वास चेन्नई च्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत पंजाब च्या बलाढ्य संघाला केवळ 106 धावांवर रोखले,त्यानंतर फलंदाजी साठी उतरलेल्या चेन्नई ने टिच्चून फलंदाजी केली,चेन्नई कडून दीपक चाहर याने चार बळी घेत पंजाब ला रोखले त्यानंतर चेन्नई च्या फलंदाजानी उरलेलं काम करत हे टार्गेट पूर्ण केलं .अवघ्या 15 षटकात चेन्नई न चार गड्यांच्या मोबदल्यात हे टार्गेट पूर्ण केलं .
राजस्थान सोबतच्या सामन्यात 226 धावांचा डोंगर उभ्या करणाऱ्या पंजाब चा संघ चेन्नई समोर मात्र अक्षरशः गडगडला .20 षटकात केवळ 106 धावांवर पंजाब चा संघ थांबला .चेन्नई कडून दीपक चाहर ने चार बळी घेतले तर पंजाब कडून शाहरुख खान ने 40 पेक्षा जास्त धावा करत शंभरी पार केली .
चेन्नई कडून फाफ दुप्लेसी आणि मोईन अली यांनी चांगली फलंदाजी करत आपल्या संघाला विजयं मिळवून दिला .