मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मनमानी किंमत घेत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. पण, आता एक मोठी माहिती समोर येत आहे. रसायन आणि खते मंत्रालयाने या इंजेक्शनची मॅक्सीमम सेलींग प्राइस ठरवली आहे. आता या इंजेक्शनसाठी जास्तीत - जास्त 3500 रुपये मोजावे लागतील.
एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ आहे, तर दुसरीकडे रेमेडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. यातच आहे त्या इंजेक्शनसाठी मोठ्या किमतीची मागणी केली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. यामुळे आता अखेर रसायन आणि खते मंत्रालयाने बुधवारी दिलासा देणारी मोठी घोषणा केली. मंत्रालयाने सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांनी या इंजेक्शनची किंमत ठरवली आहे. आता या इंजेक्शनसाठी जास्तीत जास्त 3500 रुपये मोजावे लागतील. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (NPPA) देशभरात याच्या उपलब्धतेवर लक्ष्य ठेवेले.
मंत्रालयाने सांगितल्यानुसार, देशात सध्या रेमडेसिवीरचे 7 मॅन्यूफेक्चरर्स आहेत. ते एका महिन्याला 38.80 लाख इंजेक्शन तयार करू शकतात. आता अजून 6 कंपन्यांना याच्या प्रोडक्शनची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दरमहा दहा लाख इंजेक्शन तयार होतील.
देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 1 लाख 85 हजार 104 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 1,026 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 82,231 रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये 1 लाख 1 हजार 835 लोकांचा समावेश झाला आहे. गेल्या चोवीस तासांतील मृत्यूंचा आकडा हा पहिल्यांदाच सर्वात जास्त आला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी 1,281 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्येक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरी पण कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे