मुंबई : मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अनिश्चिततेवर पडदा टाकत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर राज्यात एप्रिल अखेरपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनची सुरुवात बुधवारी सायं.8 वाजता होणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात मात्र मतदान होईपर्यंत लॉकडाऊनमध्ये सवलत राहणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात या गोष्टी राहणार बंद
दिवसभर संचारबंदी
सर्व आस्थापना बंद
या गोष्टींना सवलती
अत्यावश्यक सेवा स.7 ते संध्या 8 पर्यंत सुरु
सार्वजनिक वाहतूक (अत्यावश्यक सेवेसाठी) सुरु
बँका सुरु
रुग्णालये, औषधी दुकाने, लस वाहतूक
माध्यम
पेट्रोल पंप
पावसाळापूर्व कामे
जनावरांशी संबंधित सेवा
हॉटेल, रेस्टॉरंट होम डिलेव्हरीसाठी सुरु
रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना स.7 ते रात्री 8 पर्यंत परवानगी
बातमी शेअर करा