Advertisement

 तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल

प्रजापत्र | Wednesday, 07/04/2021
बातमी शेअर करा

मुंबई : 14 लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण  ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे.केंद्र लस पाठवतात पण गती कमी आहे. जसं सांगितलं जातंय तसा पुरवठा होत नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी सांगितले. अनेक ठिकाणी लस नाही, अनेक जिल्ह्यात लस नाही म्हणून केंद्र बंद करावी लागत आहेत. या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत.आम्ही ३ लाख दररोज लसीकरण करत होतं ते ६ लाख करा असं सांगितलं. आज आम्ही ४.५ लाखापर्यंत पोहचलो पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. लस नाही म्हणून  अनेक केंद्रावरून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. लसीचा पुरवठा करा असं आम्ही केंद्राकडे वारंवार सांगतोय असे ते म्हणाले. 1200 मेट्रीक टन ऑक्सीजन तयार होतो. 700 मेट्रीक टन लागतो. त्यामुळे ऑक्सीजनची मागणी वाढत चाललीय. आजूबाजूच्या राज्यातून ऑक्सीजनचा पुरवठा करा अशी मागणी केलीय. 

 

५० हजार रेमडेसेवीर दिवसाला मिळतायत पण त्या सर्वांचा वापर होतोय. रेमडेसेवीरच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकारने मदत करायला हवी. सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसेवीरचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार द्या. गरज नसताना रेमडेसेवीर दिले जातेय असं लक्षात आलंय असेही ते म्हणाले. 
 डॉक्टरांनी आपलं बिल वाढवण्याकरिता असं करू नका.रेमडिसिव्हरचा भाव ३ ते ४ हजार केला जातो. ते ११०० ते १४०० च्या वर विकू नये असं आपण ठरवलं
पण त्याचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसेवीरची किंमत ठरवेल.

 

त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. काही ठिकाणी दुकानं बंद केल्याचा रोष होतोय पण आपल्याला जीव वाचवायचे आहेत. निर्बंधात शिथिलता हवी असेल तर नियम काटेकोर पाळले पाहिजेत. थोडी कळ सोसायला हवी असेही ते म्हणाले. 

Advertisement

Advertisement