Advertisement

दोन तासांत तंबाखूचा पुडा ५० रुपयांनी महागला

प्रजापत्र | Friday, 26/03/2021
बातमी शेअर करा

बीड- वर्ष होऊन गेले, जनता कोरोनाचा सामना करत आहे. याची दुसरी लाट आली असून गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दररोजच्या अहवालातून दिसून येत आहे. जे नको होते तेचे झाले असून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल असा दहा दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन घोषित केला.

 

ही बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच लहान सहान व्यापारी, मजुरांसह हातावर पोट असलेले लोक पोटापाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेत बुडून गेले. ३५० रुपयांचा तंबाखूचा पुडा दोन तासांत ४०० रुपयांना झाला. येत्या दहा दिवसांत आणखी किती वाढ होणार, याची उत्सुकता पाहणे बाकी आहे. लॉकडाऊनच्या आडून स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या संधीसाधूंवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement