Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेश संघटकपदी कुंदन काळे

प्रजापत्र | Thursday, 25/03/2021
बातमी शेअर करा

बीड-येथील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते कुंदन काळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेश संघटकपदी नियुक्त करण्यात आले आहे.गुरुवारी (दि.२५) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
                पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यावेळी बीडचे कुंदन शिवलाल काळे यांना विद्यार्थी प्रदेश संघटकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.काळे हे युवा कार्यकर्ते असून सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे मोठे योगदान आहे.राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत मोठी जबाबदारी देण्यात आली.दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतरा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,अमोल मिटकरी, अतुल बेनके, सूरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

 विद्यार्थ्यांच्या अडचणी तत्परतेने सोडविणार 
राष्ट्रवादी पक्षाने माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी टाकली.मी आजपर्यंत सामाजिक कार्य करताना कायम लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.त्याचे फळ आज मला मिळाले.पक्षाने टाकलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलणार असून विद्यार्थ्यांच्या अडचणी तत्परतेने सोडविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेश संघटक कुंदन काळे यांनी म्हटले आहे. 

 

Advertisement

Advertisement