बीडः कोरोना काळात निम्म्यावर आणलेले शिवभोजन थाळीचे दर आता राज्य सरकारने पुन्हा वाढविले आहेत. १ एप्रिल पासुन शिवभोजन थाळीसाठी ग्राहकाला पुन्हा १० रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडिचे सरकार आल्यानंतर शिवभोजन योजना सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत १० रुपयांत जेवनाची सोय करण्यात आली होती. मात्र कोरोना सुरु झाल्यानंतर सरकारने शिवभोजन थाळीचे दर अर्ध्यावर आणले होते. ग्राहकांना ५ रुपयात ही थाळी उपलब्ध करुन देण्यात येत होती.
आता मात्र शिवभोजनाचे दर वाढविण्यात आले असुन १ एप्रिल पासुन शिवभोजनासाठी पुन्हा १० रुपये मोजावे लागणार आहेत.
बातमी शेअर करा