बीड-कोरोना रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यात वाढत असून थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी 26 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये बीड शहरातील 12 पॉझिटिव्ह हे खाजगी रुग्णालयाच्या सहवासातील असून उर्वरित चार जणांमध्ये सावतामाळी चौक 1 , माळीवेस 1, चंपावती नगर 1 व अन्य एका भागातील 1 रहिवाशी आहेत. तर गेवराईतील तिघे बोरडे गल्ली, सुलतानपूर, गणेश नगर भागातील आहेत. तर परळीतील पाच जणांमध्ये चार जुने रेल्वे स्थानक परिसरातील असून एक इंजेगावमधील आहे. तसेच अंबाजोगाई शहरातील एक व आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 166 च्या घरात गेली आहे.
बातमी शेअर करा