Advertisement

वाळुच्या आठ टॅक्ट्ररवर हजारेंची कारवाई !

प्रजापत्र | Friday, 12/03/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि. १२ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी अनाधीकृत तसेच विना रॉयल्टीचे आठ टॅक्ट्रवर कारवाई  करण्यात आली आहे. सदरील  कारवाई  ही पोलीस अधीक्षक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी केली झालेल्या कारवाईत  ५८ लक्ष २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

    या बाबद अधीकृत माहिती अशी कि गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जाते परंतू काही दिवसांपासुन महसुल तसेच पोलीस अधीक्षक यांचे पथक हे एक्शनमोडमध्ये आलेले आहे आज सकाळी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी देखील बांगपिपळगाव या ठिकाणावरून जात असलेला वाळूचा ट्रक पकडला आहे.  ही कारवाई  झाली यानंतर पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक प्रमुख विलास हजारे यांनी तब्बल आठ टॅक्ट्ररवर कारवाई  केली यामध्ये एकूण ५८ लक्ष २० हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असुन सर्व  वाहने पोलीस ठाण्यात लावले असुन यावर लवकरच पुढील कारवाई  होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी दिली आहे .

Advertisement

Advertisement