बीड-१४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बीडमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले होते.यावेळी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.यावेळी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दखल झाले होते.
इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी देण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.
बातमी शेअर करा