Advertisement

Breaking : वैद्यनाथ कारखान्याला मोठा धक्का

प्रजापत्र | Thursday, 11/03/2021
बातमी शेअर करा

बीड : कामगारांच्या पगारी थकल्याने आंदोलन सुरु असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला आता सरकारकडून आणखी एक धक्का बसला आहे. वैद्यनाथ कारखान्याने थकविलेली उसउत्पादकांची एफआरपीची रक्कम महसुली वसुली म्हणून वासून करण्याचे आदेश राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांन दिले आहेत. 
माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी वाढतच आहेत. कारखान्याने उसउत्पादकांची एफआरपीची रक्कम थकविल्याने कारखान्याला नोटीस देण्यात आली होती. मात्र कारखान्याने सदर रक्कम न दिल्याने आता २५ कोटी ७९ लाखाच्या थकबाकीसाठी राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसीप्रमाणे वसुलीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यनाथ कारखान्यासाठी २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी २ हजार ११३ रुपये इतका एफआरपीची दर निश्चित करण्यात आला होता, मात्र कारखान्याने तो न दिल्याने उसउत्पादकांचे तब्बल २५ कोटी थकले आहेत . आता ही रक्कम महसुली वसुली म्हणून वसूल करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. साखर , मोलॅसिस याची विक्री करून आणि गरज पडल्यास कारखान्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करून सदर वसुली करावी असे आदेश सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. 

Advertisement

Advertisement