बीडः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हयातील शाळा बंदची मुदत वाढविली आहे. आता ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा १० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागु करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा