आठवड्याभरात ९ बळी
बीड -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असतानाच कोरोना बळींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाचे ५ बळी गेले होते, मात्र त्या तुलनेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ७ मार्च ) जिल्ह्यात ९ कोरोना बळींची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजही ९४ % रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे असतानाही मृत्यु वाढत असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.
बीड जिल्ह्यात मागील २ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याची परिस्थती असली तरी देखील कोरोना बळींची संख्या आता पुन्हा चिंताजनक होऊ लागली आहे . १ ते ७ मार्च या आठवड्यात जिल्ह्यात ५७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर ९ कोरोना बळी नोंदले गेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९४ % आहे,५ % रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, आणि केवळ १ % रुग्णच क्रिटिकल असल्याचे आरोग्य विभागाची माहिती सांगते, तरीही मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्याचा मृत्युदर अजूनही २. ९१ % इतका नोंदवला गेला आहे . गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असतानाही मृत्यूंवर नियंत्रण का मिळत नाही हाच सध्या गंभीर प्रश्न आहे.
तुलनात्मक आकडेवारी
२१-२८ फेब्रुवारी १- ८ मार्च
नवीन रुग्ण ३ ६३ ५७३
मृत्यू ५ ९
पॉझिटिव्हिटी दर ९. १८ % ९. १५ %
मृत्यू दर २. ९५ % २. ९१ %
लक्षणे नसणारे रुग्ण ९२. ८ % ९३. ९ %