Advertisement

साडे सहा हजार पदांची भरती.......!

प्रजापत्र | Tuesday, 02/03/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२ - सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी सरकारी नौकरीची एक संधी निर्माण झाली असून  कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून 2 मार्च ते 31 मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पासून सुरुवात झाली आहे. 

        यामध्ये विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर, स्टेनोग्राफर यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. 6552 पदांसाठी भरती केली जाणार असून वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिक माहितीसाठी  esic.nic.in या वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे.तर जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणं ही आवश्यक आहे.                 दरम्यान वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे. त्यामुळे नौकरीची शोधात असणाऱ्यांनी संधी न दवडता तात्काळ अर्ज करावेत.

Advertisement

Advertisement