मुंबई दि.०१ (प्रतिनिधी) - पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर खूप दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रूपये दिल्याचा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.पूजाच्या आई-वडिलांनी घरातच ते 5 कोटी रुपये पुरून ठेवले आहेत. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडण सुरू आहेत. पूजाचे आई-वडील हे पैशापोटी बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूजाला योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंतीही शांता राठोड यांनी केली आहे.दरम्यान पूजाच्या आई वडिलांनी पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहे, असं शांता राठोड यांनी म्हटलं आहे.
बातमी शेअर करा