आष्टी-तालुक्यातील फत्तेवडगाव गावात एका अट्टल दरोडेखोराला गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला.हकीम नारायण भोसले नावाच्या या दरोडेखोरांवर पुणे,नगर आणि बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल आहेत.
हकीम भोसले हा या परिसरातील कुख्यात दरोडेखोर होता.त्याच्यावर आणि त्याच्या भावावर बीड, पुणे आणि नगर जिल्ह्यात अनेक गुन्हे आहेत. हकीम हा रविवारी रात्री फत्तेवडगाव परिसरात दिसल्यानंतर त्याच्यात आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाले आणि गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली,याच मारहाणीत त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरोडा, जबरी चोरी, प्राणघातक हल्ले असे अनेक गुन्हे हकीम भोसले वर नोंदविण्यात आले असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
बातमी शेअर करा