बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांवर एकही अर्ज आतापर्यंत पात्र ठरवण्यात आलेला नसतानाच आता विमुक्त जाती मतदारसंघातून मात्र ३ अर्ज पात्र ठरले आहेत. यामुळे या ठिकाणी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत तर अनुसूचित जाती आणि ओबीसी मतदारसंघात प्रत्येकी एकच अर्ज पात्र ठरला आहे. या मतदारसंघातील निर्णयासाठी राखीव ठेवलेले अर्ज पात्र झाले नाहीत तर हे दोन मतदारसंघ बिनविरोध निघू शकतील.
बीड जिल्हा जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवा सांठा मतदारसंघात एकही अर्ज पात्र ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीभोवतीच अस्थिरतेचे वलय निर्माण झाले आहे. मात्र अनुसूचित जाती मतदारसंघातून रवींद्र दळवी यांचा एकच अर्ज पात्र ठरला असून तब्ब्ल ५ आर्जावरचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तर ओबीसी मतदारसंघातून रंगनाथ धोंडे यांचा एकमेव अर्ज पात्र ठरला असून आखाडे यांच्या अर्जावरचा निर्णय राखीव आहे.
विमुक्त जाती मतदारसंघातून ३ अर्ज पात्र ठरले आहेत . यात महादेव तोंडे, चंद्रकांत सानप आणि सत्यसेन मिसाळ यांचा समावेश आहे, त्यामुळे या ठिकाणी लढत अपेक्षित आहे.
प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा