बीड-राज्यात मागील १० दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना बीड जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.रविवारी (दि.२१) आरोग्य विभागाच्या अहवालात ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे अर्धशतक झाल्यानंतर रविवारी पुन्हा ५३ बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासीयांसाठी चिंतेचा विषय ठरू लागला आहे.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १९,आष्टी १,बीड १६,धारूर १,गेवराई १,केज ३,परळी ५,पाटोदा १,शिरूरमध्ये ६ रुग्ण आढळून आले.दरम्यान घटलेली रुग्ण संख्या वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
बातमी शेअर करा