Advertisement

पुणेकरांवर पुन्हा निर्बंध! शाळा-महाविद्यालये राहणार बंद

प्रजापत्र | Sunday, 21/02/2021
बातमी शेअर करा

पुणे-शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कोरोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

 


 

पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२१ फेब्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लग्न समारंभासह राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी अगोदर पोलिसांची परवनगी घ्यावी लागणार असून, २०० नागरिकांचं बंधन घालण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 

Advertisement

Advertisement