नवी दिल्ली : दिल्लीतील कनॉट प्लेस येथे आयोजित 'लहरा दो तिरंगा' रॅलीपूर्वी पोलिसांनी कारवाई करत सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि आयसाच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र संताप व्यक्त करत, या परिस्थितीची तुलना 'अघोषित आणीबाणी'शी केली आहे.
परिसरात कलम १६३ लागू:कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क परिसरात 'लहरा दो तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या परिसरात कलम १६३ लागू केल्यामुळे आंदोलकांना तेथे प्रवेश करता आला नाही.
नेत्यांची धरपकड:अभिजीत दिपके हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या एका प्रवक्त्याच्या निवासस्थानी थांबले होते. तेथून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच, AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांना मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सहा दिवसांतील दुसरी कारवाई:अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याची गेल्या सहा दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. याआधी १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतर
आंदोलनापूर्वीही त्यांना ताब्यात घेण्यात आले होते व दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका झाली होती.
निषेधार्थ निदर्शने:या कारवाईच्या निषेधार्थ AISA च्या समर्थकांनी जंतरमंतरवर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
ममता बॅनर्जी यांची सरकारवर टीका
या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "स्वतंत्र भारतात हातामध्ये राष्ट्रध्वज घेतलेल्या तरुणांना शांततेने त्यांचे लोकशाही हक्क बजावल्याबद्दल ताब्यात घेतले जात आहे. हे अघोषित आणीबाणीपेक्षा कमी नाही. विरोधाला घाबरलेले सरकार आता संपूर्ण पिढीला गप्प बसवण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.

